नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत जळगावचे ९१.७० टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |

 
जळगाव, २५ जून :
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत जळगाव जिल्हयात ९१.७० टक्के मतदान झाले. नाशिक येथे झालेली हाणामारी वगळता मतदान शांततेत झाले.
 
 
जळगाव जिल्हयात अमळनेर येथे १ हजार ३३ मतदारांपैकी ९९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर चोपडा ८१२ पैकी ७४४, यावल ८१३ पैकी ७७४, रावेर ७४० पैकी ६९१, मुक्ताईनगर ४२० पैकी ३९३, बोदवड २४१ पैकी२३३, भुसावळ १३६४ पैकी १२४४, जळगाव २३८० पैकी १९५४, धरणगाव ३६१ पैकी ३५४, एरंडोल ४३२ पैकी ४०१, पारोळा ५३८ पैकी ५२७, भडगाव ५५४ पैकी ५२७, चाळीसगाव ९९२ पैकी ९५६, पाचोरा ७०४ पैकी ६३६ व जामनेर ६७२ पैकी ६४१ असे मतदान झाले. जिल्हयात १२ हजार ५६ मतदारांपैकी ११ हजार ६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदानाची टक्केवारी धरणगाव येथील मतदान केंद्रातीची असून तेथे ९८.०६ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान जळगाव मतदान केंद्रावर झाले येथे ८२.१० टक्के मतदान झाले.
 
 
ना. गिरीश महाजनांची उपस्थिती
जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे दुपार पासून जळगाव येथील भाजपाच्या बुथवर उशिरा पर्यंत उपस्थित होते. यावेळी आ.सुरेश भोळे, जिल्हा संघटक विशाल त्रिपाठी, महेश जोशी, दीपक सुर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, बापू ठाकरे, राहुल वाघ, विनोद मराठे, राहूल पाटील, ज्योती चव्हाण, उज्वला बेंडाळे, जयश्री पाटील, किरण बेंडाळे, अतुल हाडा, भगत बालाणी, उदय भालेराव, जीतू मराठे, भगतसिंग निकम, आर.के.पाटील, हेमंत भंगाळे आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@