मुंबईच्या पावसाने मोडला चेरापुंजीचा विक्रम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |




 

 
मुंबईच्या विविध भागांत मुसळधार पाऊस


मुंबई: मुंबईतल्या पावसाने भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या चेरापुंजीचा विक्रम मोडला आहे. चेरापुंजीत रविवारी २२८ तर मुंबईत गेल्या २४ तासांत २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, कोकण किनारपट्टीतल्या भागात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. मागील २४ तासांत मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातला हा सर्वाधिक पाऊस ठरला. रविवारी चेरापुंजीत २२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र मुंबईने गेल्या २४ तासांत हा विक्रम मोडीत काढला आहे.

 
 
सोमवारी सकाळपासूनच मुंबईकरांना मुसळधार पावसाने चिंब केले. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्री चांगलाच जोर धरला. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्री चांगलाच जोर धरला. सोमवारी सकाळी पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. सखल भागात पाणी साचल्यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूककोंडी झाली, तर सायन, कुर्ला येथे रेल्वेट्रॅकवर पाणी आल्याने मुंबईची जीवनरेखा असलेल्या रेल्वेचा वेगही मंदावला. तिन्ही मार्गांवरील (मध्य, पश्‍चिम आणि हार्बर) रेल्वे सोमवारी सकाळी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर जाणार्‍या नोकरदारांचे हाल झाले. अनेकांनी पावसाचा रागरंग पाहून कामावर येण्याऐवजी सुट्टी घेणे किंवा घरातून काम करणे पसंत केले. बेस्टनेही मुंबईत पाणी साचल्यामुळे ४७ मार्गांमध्ये बदल केला होता.
@@AUTHORINFO_V1@@