भूमिपुत्रांनी व्यवसायाकडे वळावे :जगन्नाथ पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |




बदलापूर : भविष्यात नोकर्‍यांच्या संधी कमी होणार असल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी नोकरीच्या आशेवर अवलंबून न रहाता लहान-मोठ्या व्यवसायांकडे वळावे,” असे आवाहन आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केले.

 
 

आगरी उन्नती समाज मंडळ आणि आगरी युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी, १२ वी आणि विविध क्षेत्रांत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी पाटील यांनी हे आवाहन केले. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे, भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे, आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हात्रे, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मयुर पिसेकर, आगरी युवक संघटनेचे सल्लागार शरद म्हात्रे, दुर्वास धुळे, नियोजन सभापती तुकाराम म्हात्रे यांच्यासह विविध मान्यवर आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 
 
 

माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी देखील समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करून त्यादृष्टीने अभ्यास करावा,” असे आवाहन केले.

@@AUTHORINFO_V1@@