...तर तेजस्वी यादव होणार मुख्यमंत्री : जीतनराम मांझी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |


 
 
 
बिहार :  "नितीश कुमार यांनी जर मुख्यमंत्री पद सोडून 'महागठबंधन' मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर मात्र लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि जदयु नेते तेजस्वी यादव हे २०२० च्या निवडणुकींसाठी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील." असा खुलासा बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
२०१९ च्या लोकसभा आणि त्यापुढे विविध राज्यांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी आता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघही तैयारी करतायेत. यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 'महागठबंधन' म्हणजेच 'महायुती' करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही महायुती सत्ताधारी पक्षाला हरवण्यास समर्थ ठरू शकेल का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
 
बिहार इथं गेल्यावेळी झालेल्या निवडणुकींमध्ये नितीश कुमारचा विजय, आणि नितीश सरकारची भाजपसोबतची युती या घडामोडींनी अनेक प्रश्नांना जन्म दिला होता. मात्र आता ही युती पुढच्या निवडणुकींसाठी देखील प्रभावी ठरू शकेल का? हे बघणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@