Winners under British India, Legends under Free India : अक्षयचा 'गोल्ड' ठरणार रोचक अनुभव?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |

 
 
मुंबई :  आज पर्यंत भारतात विविध खेळांवर अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. 'लगान' असू देत, ' भाग मिल्खा भाग' असू देत, 'गोल' असू देत किंवा भारताच्या राष्ट्रीय खेळावर म्हणजेच हॉकी वर प्रदर्शित करण्यात आलेला 'चक दे इंडिया' असू देत. प्रत्येक खेळाचे आपले वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे. यामध्येच आणखी एक भर म्हणजे अक्षय कुमार घेऊन येत आहे, 'गोल्ड' हा चित्रपट. हॉकी या खेळावर आधारित मात्र एक वेगळ्या काळातील वेगळा चित्रपट. आजच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'ब्रिटीश इंडियाचे विजेचे ठरले स्वतंत्र भारताचे महापुरुष' Winners under British India, Legends under Free India असे म्हणत अक्षयने हा ट्रेलर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
 
 
 
 
विशेष महत्वाची बाब म्हणजे यामध्ये प्रसिद्ध टी.व्ही. कलाकार 'मोनी रॉय' अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसून येत आहे. आणि तिने उत्तम काम केले असल्याची झलक यामध्ये दिसली आहे. यामध्ये कुणाल कपूर, विनीत कुमार सिंह, अमित साध यांनी देखील महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. ब्रिटीश काळातील हॉकी खेळणाऱ्या भारतीय संघाची स्वातंत्र्यानंतर आपला सन्मान परत मिळवण्याची आणि ब्रिटीशांवर या खेळाच स्वातंत्र्यानंतर विजय मिळवण्याची धडपड आणि त्यासाठी अक्षय कुमारने केलेले प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
 
एकूणच ट्रेलर पाहून हा चित्रपट बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात नक्कीच जागृत झाली असणार. रीमा काटगी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत फरहान अख्यर आणि रितेश सिधवानी. भारीतय हॉकी संघाचा ब्रिटीश इंडिया ते स्वतंत्र भारत हा सुवर्णपदक जिंकण्यासाठी केलेला प्रवास बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे असे दिसते.
@@AUTHORINFO_V1@@