मोदींच्या योजना २.७५ कोटी अनु. जाती-जमातींच्या युवकांना लाभदायी : डिक्की

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |


 

 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता वेगवेगळ्या संस्था, संघटना तसेच अभ्यासकांकडून सरकारच्या कार्याकालाचे वेगवेगळ्या प्रकारे मूल्यमापन केले जात आहे. असेच मूल्यमापन दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्कीनेही केले असून, मोदी सरकारला त्यांनी पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. नरेंद्र मोदी सरकारने यापूर्वीच्या काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारपेक्षा सरस कामगिरी केली असून देशातील अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठीही या सरकारने भरीव काम केले असल्याचा दावा डीक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डिक्कीसारख्या आर्थिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने मोदी सरकारच्या केलेल्या या मूल्यमापनाला भलतेच महत्व प्राप्त झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारने अनुसूचित जाती-जमातींसाठी राबवलेल्या योजना, त्यांची अंमलबजावणी, तसेच मुद्रा योजना, यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले की, मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशात सुमारे २.७५ कोटी अनुसूचित जाती-जमातींमधील युवकांना लाभ झाला आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी ही योजना महत्वाची असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी सर्वाधिक काम झाल्याचे सांगतानाच या समाजांसाठी सरकारने राबवलेल्या योजना व त्याची तितकीच प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी ही मनमोहनसिंग सरकारच्या काळात झालेल्या कामापेक्षा कितीतरी भरीव असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@