राज्यातील स्टार्ट अपला मिळणार नवी भरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहला उद्यापासून मुंबईत सुरुवात 



मुंबई : राज्यातील वैविध्य आणि नाविन्यपूर्ण स्टार्ट अपला गती मिळावी यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहा'ची उद्यापासून मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबईतील विवंता बाय ताज हॉटेल येथे या सप्ताह पार पडणार असून राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे.

शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा या स्टार्ट अप साप्ताहमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या क्षेत्रांशी निगडीत नावीन्यपूर्ण उत्पादन व सेवा यांना या सप्ताहांतर्गत नवे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यावर देखील यासाप्ताहमध्ये भर देण्यात येणार आहेत.
राज्यातील स्टार्ट अप्सना उभारी देऊन त्यांना हातभार लावण्याचे काम राज्य शासन करणार असून, राज्यातील युवकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे, अशी माहिती संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली आहे. राज्यातील तरुण हा नोकरी शोधण्याऐवजी नोकरी उपलब्ध करून देणारा उद्योजक बनावा, हेच या साप्ताहचे मुख्य उदिष्ट असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत मागविण्यात आलेल्या एकूण २ हजार स्टार्ट अपची नोंदणी करण्यात आली असून ९०० स्टार्ट अप या साप्ताहसाठी स्वीकारण्यात आले आहेत. या संपूर्ण चार दिवसीय सत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातील स्टार्ट अपचे निवड समितीसमोर सादरीकरण करून प्रत्येकी तीन स्टार्ट अपची निवड करण्यात येणार असून एकूण २४ नवीन उद्योजकांची निवड करुन त्यांना १५ लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@