हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची अर्जेंटिनावर मात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |

२-१ ने केला पराभव





नेदरलँड :
येथे सुरु असलेल्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी-२०१८ च्या आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघाने अर्जेंटिनावर २-१ अशा गुणांनी मात केली असून स्पर्धेतील आपला दुसरा दमदार विजय साजरा केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग या दोघांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने हा विजय मिळवला असून ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली आहे.


नेदरलँडमधील ब्रेडा येथे आज हा सामना खेळवला गेला. दोन्ही मैदानात आल्यानंतर अत्यंत उत्तमपणे दोन्ही संघांनी आपल्या खेळाला सुरुवात केली होती. यानंतर भारताकडून हरमनप्रीत सिंग याने १७ व्या मिनिटाला पहिला गोल करत, भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. यानंतर थोड्या वेळाच्या खेळानंतर मनदीपने दुसरा गोल करत भारतच्या खात्यात आणखी एक गोल जमा केला. परंतु लगेच दुसऱ्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोंजालो पीलाट याने आपला पहिला गोल करत, अर्जेंटिनाचे खाते उघडले. यानंतर मात्र दोन्ही संघांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु एकाही संघाला यात यश आले नाही. सरतेशेवटी भारतीय संघाचा एका गुणाने विजय झाला.




दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघांचा हा दुसरा विजय आहे. या अगोदर काल झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. यानंतर आज भारतासमोर ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिना संघाचे आव्हान होते. त्यामुळे भारताला आजचा सामना थोडा जड जाण्याच्या शक्यता काही जणांकडून व्यक्त केली जात होती. परंतु भारतीय संघाने अर्जेंटिनावर मात केल्यामुळे सर्व स्तरातून सध्या भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@