कोकणाला अतिवृष्टीचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |

येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता





सिंधुदुर्ग : येत्या ४८ तासांमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणामध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज वर्तवला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला असून कोकणातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.


दरम्यान काल एकदिवसांची विश्रांती घेतल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. याउलट सिंधुदुर्गमध्ये मात्र पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे कोकणात नागरिकांनी आणि प्रशासनाने दक्षता घेण्या सुरुवात केली आहे.


गेल्या आठवड्याभरापासून कोकणामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर आला होता. यामुळे अनेक गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये देखील पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता. त्यानंतर कालकोकणात पावसाचा जोर थोडा ओसरला होता.
@@AUTHORINFO_V1@@