प्लास्टिकविरोधात कारवाईचा धडकापालिकेकडून चेंबूरमधील ८६७ दुकानांची तपासणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |



 

मुंबई : प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला शनिवारपासून मुंबईसह राज्यभरात सुरुवात झाली आहे. रविवारी प्लास्टिकविरोधी पथकाने मुंबईतील चेंबूरमधील ८६७ दुकानांची तपासणी केली. यात ७२ दुकानांतील ५९१ . ६७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ३ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सोमवारपासून व्यापक कारवाईचा धडाका सुरू केला जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली.
 
 

प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर मुंबई महापालिकेने पहिले दोन दिवस जनजागृतीवर भर दिला. शनिवारी दिवसभर जनजागृती केल्यानंतर रात्री उशिरा शहरातील मॉलना लक्ष्य केले. पहिल्या दिवशी तब्बल ५४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रविवारी प्लास्टिकविरोधी पथकाने मॉल, दुकानांना लक्ष्य करीत प्लास्टिकची झाडाझडती घेतली. दिवसभरात ८६७ दुकानांची तपासणी केली. यामध्ये प्लास्टिक आढळलेल्या ७२ दुकानांत केलेल्या कारवाईत ३ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर ५९१ . ६७ किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त संगीता हंसनाळे यांनी दिली. दरम्यान, सोमवारपासून प्लास्टिक पिशवी आढळल्यास ‘सक्त वसुली’ करणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. यामध्ये बडे व्यापारी-आस्थापने रडारवर राहणार असून सर्वसामान्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. यावेळी दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

 
 

राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. प्लास्टिकचा सर्रास वापर करणार्‍या मुंबईकरांना प्लास्टिकला असलेले पर्याय समजावेत यासाठी वरळीच्या ‘नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया’च्या स्टेडियममध्ये भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याबरोबरच प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यावर कारवाई करण्यासाठी निरीक्षकांचा समावेश असलेली २३ पथकांनी रॅली, प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती केली. शनिवारी रात्री फिनिक्स मॉलमधील प्लास्टिकवर कारवाई केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच नियुक्ती करण्यात आलेल्या २३ पथकांनी मुंबईतील दुकानांची तपासणी करून प्लास्टिकवर कारवाईला सुरुवात केली. सोमवारपासून व्यापक धडक कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे हसनाळे यांनी सांगितले.

 
 
 

नागरिकांकडून केवळ दंड वसूल करणे, हा पालिकेचा हेतू नाही तर पर्यावरणरक्षणासाठी लोकांना तयार करणे, त्यांचा सहभाग वाढवणे हा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने वरळीत आयोजित प्रदर्शनात एकाच व्यासपीठावर अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. प्लास्टिकबंदीला मुंबईकरांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे.

अजोय मेहता, पालिका आयुक्त

@@AUTHORINFO_V1@@