‘संगम प्रतिष्ठानच्या’वतीने मुसळधारपावसात शीव किल्ल्याची स्वच्छता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |




 

 
मुंबई: किल्ल्याच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘संगम प्रतिष्ठान’कडून गेल्या नऊ आठवड्यांपासून शीव किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
 

आज ‘संगम प्रतिष्ठान’च्या ४५ कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मुसळधार पावसातही सतत ४ तास स्वच्छता केली. यासोबत या आठवड्यात सुकलेली उन्मळून पडलेली झाडे व सुकलेल्या वेलीपासून खत प्रकल्प तयार केला.

 

सुमारे दोन ते तीन टन कचरा पालापाचोळा, झाडांच्या वेली या खत प्रकल्पासाठी दिल्या जाणार आहेत. सुका कचरा जो स्वयंसेवक वर्गीकृत करत आहेत, तो मनपाच्या सुका कचरा वर्गीकरण केंद्राला दिला जातो, असे ‘संगम प्रतिष्ठान’च्या सचिव कोमल घाग यांनी सांगितले. या अभियानात मनपातर्फे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तानाजी घाग तसेच ‘राष्ट्र अभिमान’ या सामाजिक संस्थेचे प्रशांत पळ व पर्यावरण मित्र राहुल शिंदे उपस्थित होते.पुढच्या आठवड्यात सुमारे १०० स्वयंसेवक तुळस वृंदावनाची लागवड करतील तर काही स्वयंसेवक स्वच्छतेची जबाबदारी पार पाडतील, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@