मनमाड रेल्वे स्थानक परिसर झाला अतिक्रमणमुक्त जळगाव, 24 जूनमध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड रेल्वेस्थानक परिसर व रेल्वेच्या परिसरातील अतिक्रमण 23 रोजी काढण्यात आले. त्यामुळे रेल्वेस्थानक व परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. रेल्वे स्थानक व परिसर प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |

 
 
 
 
 

मनमाड रेल्वेस्थानक परिसर झाला अतिक्रमणमुक्त

जळगाव, 24 जून
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड रेल्वेस्थानक परिसर व रेल्वेच्या परिसरातील अतिक्रमण 23 रोजी काढण्यात आले. यामुळे रेल्वेस्थानक व परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. रेल्वे स्थानक व परिसर पुर्णतह: अतिक्रमण मुक्त झाला आहे.
 
 
शहर पोलिस ठाणे व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी  व कर्मचा­यांच्या संरक्षणात ही अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत पोकलॅन मशीनचा वापर करण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहिमेत आता पर्यंत 508 अनाधिकृत बांधकामे तोडण्यात आली आणि सुमारे 20 एकर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.23 रोजी झालेल्या कारवाईत 6 पक्की घरे, 3 झोपडया , एक लहान मंदिर व दोन ओसरी हटविण्यात आल्या.मंदिराचे अतिक्रमण काढण्यापुर्वी सी. शर्मा यांच्याहस्ते विधीवत पुजा करुन मुर्ती हटविण्यात आली. मनमाड रेल्वे स्थानक आणि रेल्वे कॉलनी परिसर हा पुर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. पुन्हा अतिक्रमण होवू नये म्हणून मनमाड रेल्वे स्थानकाला दोन्ही बाजुंनी सुरक्षा भींत बांधण्याचे काम सुरु असून 80 टक्के काम झाले आहे. महिनाभरात संरक्षण भिंत बांधून तयार होणार आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@