प्लास्टिक बंदीविरोधात पुणेकरांचा आज 'बंद'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |


पुणे : प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज बंदाची हाक दिली आहे. पुणे जिल्हा व्यापारी संघटनेकडून हा बंद पुकारण्यात आला  असून पुणे जिल्ह्यातील १५ हजार व्यापारी या बंदात आजसामील होणार आहेत. सरकारने आपल्या धोरणामध्ये बदल करावा, अशी मागणी या संघटनेनी केली आहे. तसेच पुण्यातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या बंदात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील संघटनेनी केले आहे.


सरकारने सरसकट सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घातल्यामुळे पुण्यातील अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांवर विशेष करून खाद्यपदार्थांच्या व्यवसायावर मोठा परिणाम पडत आहे, असे मत या संघटनेनी व्यक्त केले आहे. प्लास्टिक बंदी केल्यामुळे ग्राहकांना कोणताही पदार्थ पार्सल घेऊन जाता येत नाही, त्यामुळे व्यापारावर याचा परिणाम होत आहे. तसेच प्लास्टिक बंद केल्यामुळे दुध किंवा इतर द्रव्य पदार्थांचा व्यवसाय कशा प्रकारे करायचा ? असा प्रश्न देखील निर्माण झाला असून सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा. यासाठी म्हणून हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे संघटनेनी म्हटले आहे. तसेच सरकारने आपली मागणी मान्य केल्यास सरकारविरोधात बेमुदत संप पुकारणार असल्याचेही या संघटनेनी म्हटले आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून राज्य शासनाने कालपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. तसेच प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई देखील करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे अनेकांनी प्लास्टिकला नकार दिला आहे. परंतु प्लास्टिकसाठी एक ठोस पर्याय उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांची मात्र मोठी गोची झाली आहे. अनेक पदार्थ हे प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळलेले असल्यामुळे त्यांची विक्री करायची कशी ? असा अनेकांसमोर निर्माण झाला आहे. तसेच याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला आहे. त्यामुळे सरकारने सरसकट सर्व प्लास्टिकवर बंदी घालण्याऐवजी ठराविक प्लास्टिकवरच बंदी घालावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@