आज करणार पंतप्रधान मन की बात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बातचा हा ४५ वा भाग आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक लोक सल्ले आणि महत्वाच्या बाबींविषयी माहिती पाठवतात त्याचा समावेश देखील यामध्ये नेहमीप्रमाणे करण्यात येणार आहे.
 
पंतप्रधानांनी ४४ व्या भागात महिला सानिकांच्या तारिणी मोहिमेविषयी माहिती देत त्यांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमात त्यांनी देशात खेळांविषयी वाढत्या जागरुतेविषयी आणि खेळ आणि खेळाडूंच्या आवश्यकतेविषयी माहिती दिली. याआधी त्यांनी स्वच्छ भारत समर इंटर्नशिप आणि इतर उपक्रमांविषयी देखील माहिती दिली होती.
 
आजच्या कार्यक्रमात ते नवीन शालेय सत्र, काश्मीर येथे वाढता हिंसाचार, देश भरात साजरे करण्यात येणारे सण इत्यादीविषयी माहिती देतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडियो (दूरदर्शन) आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप्लिकेशनवर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान कार्यालय, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनेलवर आणि डीडी न्यूजवर प्रसारित केले जाईल.
@@AUTHORINFO_V1@@