लोकलच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |

 
 
मुंबई :  आज रविवार असल्यामुळे माणसांची वर्दळ कमी असेल, त्या कारणाने मुंबई येथे लोकल रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे शनिवार - रविवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. या मेगाब्लॉक मुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे :
 
बोरीवली ते गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉक दरम्यान लोकल धीम्या मार्गावर चालवल्या जातील. तर बोरीवली स्थानकातील १,२,३ आणि ४ वरुन एकही लोकल धावणार नाही.
मध्य रेल्वे :
मध्य रेल्वेवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर हा ब्लॉक असून, जलद मार्गावरुन वाहतूक वळवली जाईल. नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकावर लोकल थांबवल्या जाणार नाहीत.
ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप धीम्या लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ४.२ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान चालवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात त्यांना थांबे दिले जातील.
मेगाब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसणार आहे. त्यामुळे या काळात दादर आणि सीएसएमटी स्थानकात थांबणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर : 
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा आहे.
@@AUTHORINFO_V1@@