स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण -डोंबिवलीचा ९७ वा क्रमांक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |



 

 
डोंबिवली : मागील वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे घसरलेले मानांकन लक्षात घेता शहर स्वच्छतेसाठी पालिकेने चांगलीच कंबर कसली व यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात ९७ व्या क्रमांकावर झेप घेत पहिल्या शंभर शहरांत येणाचा मान पटकावला आहे.
 
 

‘स्वच्छ भारत अभियाना’स ऑक्टोबर २०१४ रोजी सुरुवात झाली. या अनुषंगाने दरवर्षी शहरांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. यात पहिल्या वर्षी १०० शहरांत कल्याण डोंबिवली शहराचा ६३ वा क्रमांक लागला. यावेळेस पालिकेच्या वतीने शहर स्वच्छता संकल्पना राबविण्यात आल्या खर्‍या पण त्या संकल्पना पुरत्या फार्स ठरल्या व त्यानंतर या ५०० शहरांत केडीएमसीचा २३४ वा क्रमांक लागला. यामुळे पालिकेने संकल्पनांचा तगादा लावत हे मानांकन उंचावण्यासाठी वर्षभरात सर्वतोपरी प्रयत्न केले.तसेच महापौर राजेंद्र देवळेकर व इतर लोकप्रतिनिधींच्या वतीने हे मानांकन उंचावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाला वर्षभर धारेवर धरण्यात आले. महासभा तसेच स्थायी समिती सभा यामुळे कित्येकदा तहकूब करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने ‘कॉल ऑन डेब्रिज’, ‘इ-वेस्ट’ गोळा करणे, ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण व १३ बायोगॅस प्रकल्पाची संकल्पना पालिकेच्या वतीने राबवली जात आहे. याचा फायदा शहराचे स्वच्छता मानांकन सुधारण्यास झाला आहे.

 
 

केंद्र शासनाच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात सिटिझन फीडबॅकसाठी ३५ टक्के, थेट निरीक्षणांसाठी ३५ टक्के तर पालिकेने केलेल्या इतर प्रयत्नांना ३० टक्के असे गुणांकन ठरविण्यात आले होते. असे असले तरी दोन्ही शहरांतील कचरा प्रश्‍न सोडविण्यात पालिका अपयशीच आहे. आजही शहरात ठिकठिकाणी कचरा पडल्याचे चित्र दिसत असल्याच्या तक्रारी नागरिक करताना आढळतात. त्यामुळे या मानांकनावर समाधान मानायचे की यातून आणखी प्रगती करत शहरावर लागलेला अस्वच्छतेचा आणि घाणेरड्या शहराचा बट्ट्या पुसून टाकायचा याबाबत आगामी काळात पालिकेने सक्षम भूमिका घेणे अनिवार्य आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@