भिवंडीतील पदवीधर मतदारांची३० किलोमीटरची फरफट टळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |



 

 
खा. कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश


भिवंडी : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील वज्रेश्वरी येथील केंद्रात टाकण्यात आलेली ३० किलोमीटरवरील मतदारांची नावे वगळून भिवंडी येथील केंद्रात वर्ग करण्यात आली आहेत. भाजपचे खा. कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने पदवीधर मतदारांना दिलासा मिळाला आहे.

 
 

भिवंडी तालुक्यातील काल्हेर-अंजूर दिवे येथील काही मतदारांची नावे थेट वज्रेश्वरी येथील केंद्रात होती. त्यामुळे तब्बल ३० किलोमीटरचा प्रवास करून मतदारांना वज्रेश्वरी येथील केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा लागणार होता. या प्रकाराने मतदारांमध्ये नाराजी होती. त्याची तातडीने दखल घेऊन खा. कपिल पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना पत्र पाठविले होते. तसेच मतदान केंद्रांबाबतचा गोंधळ दूर करण्याची मागणी केली होती.

 
 

या पत्राची जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी दखल घेऊन निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला होता. त्यानंतर आज मतदान केंद्रांबाबतचा गोंधळ दूर करण्यात आला. तसेच काल्हेर, अंजूर दिवे येथील मतदारांची नावे भिवंडीतील केंद्राला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या मतदारांची तब्बल ३० किलोमीटरची फरफट टळणार आहे. या प्रकरणी तातडीने दखल घेतल्याबद्दल खा. कपिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश पाटील व जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आभार मानले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@