सर्व बँकांकडून शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे : मुख्यमंत्र्यांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |

मुंबई : राज्यातील सर्व बँकाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र लिहीले आहे. या पत्रात फडणविसांनी, "सध्या खरीप पीक घेण्याची वेळ आहे आणि कर्जाचे धीम्या गतीने वितरण झाल्यास ते शेतकऱ्यासाठी फायद्याचे होणार नाही." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी य़ा पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ही मागणी करण्यात आली असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
"सर्व मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, की पीक कर्जाच्या वाटपावर लक्ष ठेवा. तथापि राष्ट्रीय आणि खासगी बँकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. पावसाच्या आगमनानंतरही बँक मंद गतीने कर्ज वितरीत करत आहेत. तर राज्य सरकारने ऐतिहासिक कर्ज माफी दिली होती. त्यामुळे आता नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे." असेही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
 
शेतकऱ्यांतर्फे कर्ज माफ, पिकांसाठी योग्य भाव आणि स्वामीनाथन आयोगाची पूर्तता करण्यासाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे पत्र लिहिले असल्याचे म्हटले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@