शहर स्वच्छतेबाबत अंबरनाथ पालिका देशात ६७ व्या क्रमांकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |



 

 
अंबरनाथ : देशभर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ स्पर्धेत अंबरनाथ नगरपालिकेचा नंबर ६७ वा आला आहे तर मागील वेळी झालेल्या स्पर्धेत नगरपालिकेचा क्रमांक ८९ वा होता. यंदा मात्र पालिकेने ६७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’मध्ये अंबरनाथ नगरपालिका सहभागी झाली होती. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगरपालिकेने काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सलील जव्हेरी यांची शहराचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, उप नगराध्यक्ष अब्दुल शेख, पालिका मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या हस्ते जव्हेरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यानंतर शहरात प्रत्येक प्रभागात स्वच्छतादूत यांची नियुक्ती करण्यात आली. लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतादूतांनी शहर स्वच्छतेची व्यापक मोहीम हाती घेतली. शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेण्यात आले होते. ओला आणि सुका कचर्‍याचे विलगीकरण करण्याबरोबरच नागरिकांमध्ये प्रभागा प्रभागात शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. भित्तीचित्रेदेखील काढण्यात आली होती.

@@AUTHORINFO_V1@@