ठाण्यातून दुसर्‍या दिवशी १०० किलो प्लास्टिक जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2018
Total Views |



 

६० हजार दंड वसूल


ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज जोरदार पावसातही प्लास्टिकविरोधी मोहीम चालू ठेवून शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधून जवळपास १०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्याचबरोबर या सोसायट्यांमध्ये प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. दरम्यान आज कळवा आणि मुंब्रा परिसरातील प्लास्टिकचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांकडून जवळपास ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

 

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधून ही मोहीम राबविण्यात येऊन त्यांना प्लास्टिक न वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्याकडील १०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

 

दरम्यान, कळवा आणि मुंब्रा विभागातही प्लास्टिकविरोधी मोहिमेंतर्गत जवळपास ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@