इंदौरच्या इसमाची मुक्ताईनगर – खामखेडा पुलावरुन उडी घेवून आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |

 
इंदौरच्या इसमाची मुक्ताईनगर – खामखेडा पुलावरुन उडी घेवून आत्महत्या

मुक्ताईनगर , 23 जून
खामखेडा येथील  नदीपात्रात इंदौर येथील इसमाने उडीमारुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. त्याच्या जवळील आधारकार्डवरुन त्याची ओळख पटली.
 
 सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर – खामखेडा पुलावरुन पुर्णा नदी पात्रात एका इसम उडी मारतांना जवळच असलेल्या मत्स व्यवसाय करत असलेल्या भारत जुन्या, गजराबाई भारत भोई व मोती खाटीक यांनी पाहिले. त्यांनी नदीपात्रात धावतच जावून नावेच्या सहाय्याने त्याला काढण्याचा प्रयत्न केला.  या तीघांनी त्याला गाळातुन बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत केली. परंतु इसम गाळात फसुन मयत झाला होता. दरम्यान पुलावरुन ये-जा करणारे किरण कोळी, शिवसेनेचे शाखा प्रमुख स्वप्नील श्रीखंडे हे  तीघांच्या मदतीला धावून गेले. तोपर्यंत पेालीस प्रशासन , शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, हरी माळी, प्रवीण भोई आदी उपस्थित झाले.
 
मयताच्या खिशातुन चारशे वीस रुपये  , परिवाराचे छायाचित्र, आधार कार्ड व वीज बील मिळून आले. आधारकार्ड वरुन मयताची ओळख पटली असून त्याचे नाव विजय प्रभाकर प्रधान असून तो इंदौर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. स.फौ. कोलकार माणिक, माणिक निकम यांन इंदौर येथील पोलीस ठाण्यास संपर्क साधणार असल्याचे सांगीतले.
 
@@AUTHORINFO_V1@@