विविध कामांसाठी रेल्वेचा आज मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |



 

मुंबई : विविध कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर, पश्चिम मार्गावर रविवार, २४ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगामध्ये अप धीम्या मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत अप धीम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे. या कालावधीत नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप धीम्या लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ४.०२ पर्यंत अप जलद मार्गावर मुलुंड ते माटुंगामध्ये चालवल्या जाणार आहेत. त्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव स्थानकात थांबणार आहेत. त्यानंतर या लोकल पुन्हा माटुंग्यानंतर अप मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

 
सीएसएमटी येथून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी २.५४ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकावर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप जलद, अर्धजलद लोकल सकाळी ११.०४ ते दुपारी ३.०६ या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीपर्यंत सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ आणि पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीपर्यंत सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या लोकल सेवा खंडित केल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-कुर्ला, वाशी-पनवेलमध्ये विशेष लोकल सोडल्या जातील. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावमध्ये अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप-डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप-डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म १,२,३ आणि ४ वर थांबणाऱ्या काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@