मुंबई महापालिकेचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |




मुंबई : मुंबई महापालिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ पुरस्कार देऊन मध्य प्रदेशातील इंदूर येथील ‘नेहरु स्टेडियम’ येथे गौरव करण्यात आला आहे. मुंबईकरांच्या वतीने महापौर विश्वनाथ महाडेश्वर व महापालिका आयुक्त अजोय मेहता, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई महानगरपालिकेने देशभरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या महिन्यात दि. १९ मे २०१८ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदे दरम्यान ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले असल्याचे घोषित करण्यात आले होते. यानुसार ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ च्या पुरस्कारांचे वितरण मध्य प्रदेशातील इंदूर येथील नेहरु स्टेडियम येथे आज करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संवाद साधताना महापालिका आयुक्त जोय मेहता यांनी स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाल्याचे नमूद करत सर्व संबंधितांचे कौतुक केले आहे. तसेच नागरिकांनी केलेल्या सक्रीय सहकार्या करिताही आयुक्तांनी मुंबईकरांचे विशेष आभार मानले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@