एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |




मुंबई : वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत इमारत क्रमांक दोनमध्ये राहणार्‍या एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या केली. राजेश भिंगारे (४५) यांनी पत्नी आणि दोन मुलांसह राहत्या घरी आत्महत्या केली. गरीबी आणि नैराश्याला कंटाळून या संपूर्ण कुटुंबाने आपले जीवन संपवले. आज सकाळपासून त्यांच्या घरातून कोणीही बाहेर पडले नाही म्हणून शेजार्‍यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना घरातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळले. शेजार्‍यांनी लगेच खेरवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

 

पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये मागच्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत असे लिहिले होते. राजेश भिंगारे चर्चगेट येथील रेशनिंग ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करत होते. त्यांची पत्नी अश्विनी गृहिणी होती. त्यांचा मुलगा तृषार (२३) नोकरीला होता आणि दुसरा मुलगा गौरांग (१९) कॉलेजमध्ये शिकत होता. राजेश आणि त्यांच्या पत्नीने जेवणात विष मिसळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. "सध्यस्थितीत ही आत्महत्या वाटत आहे. भिंगारे यांनी चिठ्ठीमध्ये आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे”असे खेरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@