माहुलगाव येथील सुरक्षारक्षक कंत्राटदाराकडून फसवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |

सुधार समिती अध्यक्षांचे कायदेशीर कारवाईचे आदेश

 
 
 
 
मुंबई : माहुलवासियांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून पालिकेची फसवणूक करण्यात येत आहे. कमी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत, त्यांना पगारही कमी दिला जातो. असे सांगत महादेव शिवगण यांनी सुधार समितीच्या बैठकीत माहुलच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
 
माहुल येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या रहिवाशांना सांडपाण्यामुळे आजार झाले आहेत, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, विजेचा प्रश्न आहे, असे असताना यामध्ये आणखी एका नव्या प्रश्नांची भर पडली आहे ती म्हणजे सुरक्षा रक्षकांची. येथे सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंत्राटदाराने पालिकेची फसवणूक केली आहे. पालिकेकडून प्रति सुरक्षारक्षक १६००० रुपये घेत असताना त्यांना ८००० रुपये दिले जात आहेत. तर पालिकेकडून तीन शिफ़्टसाठी पैसे दिले जात असताना दोनच शिफ़्ट केल्या जात आहेत. प्रति शिफ़्ट १५६ सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता असून एकूण ४५० सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत परंतु प्रभाग समिती सदस्य पाहणी करण्यासाठी गेले असताना केवळ २५ ते ३० सुरक्षा रक्षक आढळले असे नगरसेवक महादेव शिवगण यांनी सांगितले.
 
माहुलगावमध्ये एव्हरस्माईल संकुलात प्रकल्पबाधितांसाठी सदनिका आहेत. माहुलगाव येथील एव्हरस्माईल संकुलात एकूण ७२ इमारती आहेत. त्यापैकी ४५ इमारती भरण्यात आल्या आहेत. यामध्ये ४६५५ कुटुंब राहत असून येथे २५ ते ३० हजार लोकांची वस्ती आहे. तर १० इमारती पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी येथे येण्यास नकार दिला आहे. तर १७ इमारती रिकाम्या आहेत. या सदनिकांमध्ये महापालिकेच्या विविध प्रकल्पातील प्रकल्पबाधितांना येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
 
कंत्राटदाराची अरेरावी
 
प्रभाग समितीच्या पाहणी दरम्यान कमी सुरक्षारक्षक असल्याचे आपले पितळ उघडे पडेल हे लक्षात आल्यानंतर कंत्राटदाराने समिती अध्यक्षांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला असे शिवगण म्हणाले
 
@@AUTHORINFO_V1@@