गुगल : विश्व वेब व्यावसायाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |




गुगलचा अर्थ असा एक नंबर ज्याच्या नंतर शंभर शून्य असतात. गुगलच्या नावावरूनच कळते की, इथून असंख्य माहिती मिळते. त्यानंतर १९९८ मध्ये त्या कंपनीचे लिमिटेड कंपनीत परिवर्तित केले गेले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कंपनीचे पहिले नोंदणीकृत ऑफिस हे एका गॅरेजमध्ये सुरु करण्यात आले.

 

आजकाल आपल्या आयुष्याचा भाग काही गोष्टी झाल्या आहेत, त्यातील एक म्हणजे गुगल. कितीतरी विविध माहितीसाठी किंवा दैनंदिन जीवनातील उपयोगासाठी आपण गुगलचा वापर करतो. त्यामुळे नक्कीच गुगलला आपण आपला मित्र म्हणू शकतो. गुगलची सुरुवात ही प्रायोगिक तत्वावर झाली, त्यावेळी गुगलच्या संस्थापकांना याचे जाळे इतके वाढेल हे वाटलेही नसेल. १९९६ च्या दरम्यान एका रिसर्चसाठी लॅरी पेच आणि सर्गेई बिन यांनी गुगलची सुरुवात केली. कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात ते पीएच.डीचे विद्यार्थी होते. मात्र, त्यावेळी त्यांनी याचा व्यावसायिक पद्धतीने याचा वापर होईल, असे ठरविले नव्हते. मात्र, १५ सप्टेंबर १९९७ ला त्यांनी गुगलच्या ‘डोमेन नेम’चे रजिस्ट्रेशन केले. गुगलचा अर्थ असा एक नंबर ज्याच्या नंतर शंभर शून्य असतात. गुगलच्या नावावरूनच कळते की, इथून असंख्य माहिती मिळते. त्यानंतर १९९८ मध्ये त्या कंपनीचे लिमिटेड कंपनीत परिवर्तित केले गेले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कंपनीचे पहिले नोंदणीकृत ऑफिस हे एका गॅरेजमध्ये सुरु करण्यात आले. मात्र, त्यानंतर गुगलने मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवला. त्यानंतर १९९९ साली ब्लॉगरची सुरुवात झाली. ‘ऑर्कुट’ ही गाजलेली सोशल साईट गुगलने सुरु केली. आजच्या काळात गुगलच्या केवळ सर्च इंजिनचा विचार करून चालत नाही, तर गुगलचा एकूण व्यवसाय जो खूप वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा विभागलेला आहे किंवा अनेक कंपन्यांनी गुगलचे अधिग्रहणसुद्धा केले आहे त्यांचाही विचार करावा लागतो. तंत्रज्ञान, इंटरनेट सॉफ्टवेअर आणि आता हार्डवेअरसुद्धा, जीवविज्ञान, स्वयंचलित कार, संशोधन आणि विकास, या सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आता गुगलचा पसारा वाढलेला आहे. गुगलच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्याची संख्या ८० हजार आहे आणि त्यांचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे. अमेरिकेतील दोन महत्त्वाचे स्टॉकमार्केट ‘SNP ५००’, आणि ‘nashdack १००’ या दोन्हीमध्ये गुगल ही एक नोंदणीकृत कंपनी आहे आणि त्यांच्या समभागांचे व्यवहार इथे केले जातात. २०१५ साली गुगलने आपले कॉर्पोरेट पुनर्गठन करून आणि ‘अल्फाबेट इंक’ या कंपनीची स्थापना केली. ज्याचे अध्यक्ष गुगलचे संस्थापक सर्गेई आहेत आणि दुसरे आणि मुख्य संस्थापक लॅरी पेच आहेत, जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. गुगलच्या उत्पन्नाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात येते की, गुगलकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी मोफत मिळतात. मात्र, तरी आपल्याच माध्यमातून गुगलला खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्नसुद्धा मिळत असते. स्वतःचे सर्च इंजिन आणि नेटवर्क जे गुगलने तयार केलं आहे, ते सातत्याने वाढत जाते आणि ते जितके वाढत आहे, तितके गुगलचे उत्पन्नसुद्धा वाढत आहे. जगभरातील तब्बल ८८ भाषांमध्ये गुगलच्या होमपेजचा वापर केला जातो आणि त्यामुळे जगातल्या बहुतांश भागांमध्ये गुगलचे वर्चस्व आहे. चीन आणि जपानसारखे काही देश गुगलच्या पोहोचेपलीकडील आहेत. कारण, चीनने स्वतः गुगलसारखे सर्च इंजिन आणि नेटवर्क तयार केले आहे. जपानने सुद्धा अशाच प्रकारची योजना अवलंबली आहे. मात्र, तरी गुगलकडे एकूण जो डेटा आहे, त्याची तोड इतरांना नाही. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने गुगलकडे आज डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक देशांच्या माहितीवरती गुगलचे नियंत्रण आहे, असं म्हणू शकतो. भारतासह इतर अनेक देशांनी अशी मागणी केली आहे की, अशी एखादी प्रणाली विकसित व्हायला हवी, ज्यामुळे गुगलचे माहितीवरील नियंत्रण किंवा एकाधिकार कमी होईल. मात्र, सध्या तरी गुगलला पर्याय नाही, असे आपण म्हणू शकतो.

 

ज्यावेळेला आपण गुगल सर्च करत इंटरनेटवरील कोणत्याही साईटवर जातो, त्यावेळेला ऑनलाईन लेखांबरोबर गुगलची जाहिरात असते किंवा जो काही आशय असतो, त्याला एडसनचा टूल असतो, ज्याला ‘ads by google’ असं म्हणतात. इतर अनेक वेबसाईटवरती ‘गुगल सर्च’चा पर्याय दिला जातो आणि त्या आधारे जाहिरात केली जाते. गुगलचे खूप मोठे वैशिष्ट्य असे आहे की, ज्या वेगवेगळ्या वेबसाईटवरून त्यांना जाहिराती येतात, त्यांना त्या जाहिरातीमधून तब्बल ६८ टक्के वाटा दिला जातो आणि ज्यावेळी सर्च प्रोग्राम करणाऱ्या ज्या वेबसाईट असतात, त्यांनासुद्धा जवळ जवळ ५० टक्के भाग दिला जातो. त्यामुळे गुगल बरोबर व्यवसायासाठी जोडून घेणाऱ्या अशा अनेक वेबसाईट्स किवा सर्च इंजिन आहेत आणि अगदी सर्वसामान्य लोक सुद्धा गुगलच्या आधारे जाहिरात करतात. ‘पेज पर क्लिक’ हा जो इंटरनेटवरचा पर्याय असतो, त्याप्रमाणे गुगलवरती जितकं लोक सर्च करणार, तितकी गुगलच्या जाहिरातीत भर पडणार. गुगलच्या साहय्याने जाहिराती मिळवणे हा तर मुख्य व्यवसाय आहेच, मात्र त्याचबरोबर गुगलने आता फोनचीही निर्मिती केली आहे. स्वयंचलित कार बाबतीतील प्रयोगही सुरु आहेत. संशोधनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुगल सध्या कार्यरत आहे. अनेक नवीन स्टार्टअप उदा. उबर, एअरबीएनबी गुगलने सुरु केले आहेत, ज्यांच्या आधारे गुगलचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते. गुगलकडे खूप मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असल्याने जगभरातील अनेक कंपन्यांचे गुगलकडून अधिग्रहण केले जाते. तैवानमध्ये HTCचे अधिग्रहण गुगलने केले, युट्यूबचे अधिग्रहण गुगलने केले, त्याचबरोबर अनेक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या, ज्या कंपन्या आहेत, त्यामध्ये सुद्धा आता गुगलने आपली गुंतवणूक सुरु केली आहे. ज्या सेवा आपण मोफत समजतो, त्या आधारेच गुगलला खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. गुगलचे प्रत्येक सेकंदाला आपण जर उत्पन्न पाहिले, तर ते १० लाख रुपये इतके आहे. त्याचआधारे त्यांचे उत्त्पन्न आणखी जास्त वाढत चालले आहे. गुगलने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंटरनेटवर सुद्धा वर्चस्व गाजवले आहे. म्हणजे आता इंटरनेट ब्राऊजर सुद्धा- गुगल क्रोम, यांचा साधारणतः ७५० दशलक्ष लोक वापर करतात. आयफोनसाठी सुद्धा आता गुगल मोबाईल वापरला जातो. या आधारे आपण गुगलचं वर्चस्व समजू शकतो. अॅन्ड्रॉईड फोनची सुरुवात गुगलने केली आणि आता २०१४ पासून भारतातसुद्धा अॅन्ड्रॉईड फोन उपलब्ध आहेत. अॅन्ड्रॉईडचे तंत्रज्ञानचं संपूर्णतः गुगलवरती अवलंबून आहे आणि म्हणूनच ज्यावेळी आपण अॅन्ड्रॉईड फोन घेतो, तेव्हा त्यावरती Play Store या साधनाच्या आधारे जे काही आपण डाऊनलोड करतो, ते सुद्धा गुगलच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जानेवारी ते मार्च २०१८ मध्ये गुगलच्या जाहिरातींची किंवा विक्रीची जर बेरीज केली, तर त्याधीच्या तीन महिन्यांच्या तुलनेत जवळजवळ तिपटीने वाढ झालेली दिसते. २०१७ च्या शेवटच्या तीन महिन्यात २५० कोटी डॉलरचे उत्पन्न मिळाले होते, ते २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ७३० कोटी डॉलरवर पोहोचले. म्हणजे, तीन महिन्यांमध्ये जवळपास ४३,८०० कोटी रुपयांनी गुगलचे उत्पन्न वाढले आहे.

 

गुगलची ४५ देशांमध्ये ७५ पेक्षा जास्त कार्यालये आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये गुगलने ८२७ छोट्या-मोठ्या कंपन्यांची खरेदी केली आहे. गुगलमध्ये प्रत्यक्षात ८० हजार कर्मचारी काम करतात. मात्र, अप्रत्यक्षरीत्या आणि इतर कंपन्यांचे मिळून गुगलमध्ये जवळपास साडे चार लाख कर्मचारी कार्य करतात. जगातल्या एकूण पाच स्मार्टफोन पैकी चार स्मार्टफोन हे अॅ्न्ड्रॉईडवरती चालतात. गुगलमध्ये दर आठवड्याला दोन लाखांपेक्षा जास्त लोक नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करतात. आजही गुगलच्या एकूण उत्पन्नापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न जाहिरातींद्वारे मिळते. २००६ साली गुगलने युट्यूब खरेदी केले. प्रत्येक सेकंदाला गुगल वरती ७० हजारांच्या जवळपास सर्च केले जातात. गुगलचे पूर्ण सर्च इंजिन हे १०० दशलक्ष गिगाबाईट इतकं आहे. गुगलने याहूला १ दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ते शक्य झाले नाही. गुगलच्या संस्थापकांना HTML Code बद्दल खूप माहिती नव्हती, म्हणून गुगलचे होमपेज हे खूप साधे होते आणि आजही ते साधेच आहे. २००५ साली गुगलने ‘गुगल मॅप’ आणि ‘गुगल अर्थ’ याची सुरुवात केली आणि आता संपूर्ण पृथ्वीच नाही, तर चंद्रापर्यंत त्याची पोहोच आहे. गुगलच्या सर्च इंजिनचे उपनाम हे Back Rub असे आहे. डिसेंबर २०१२ मध्ये युट्यूबवर गंगम स्टाईल डान्स व्हिडिओ पहिल्यांदा १ अब्ज लोकांनी बघण्याचा विक्रम केला होता. गुगलची ‘Alphabet’ कंपनी ही अठराशे वेगवेगळ्या डोमेन नावाने नोंदणीकृत व्यवसाय करते आणि अशा या जगाचे वेबविश्व व्यापणार्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई हे भारतीय आहेत, याचा आपल्याला निश्चितच अभिमान असलाच पाहिजे.

 

प्रा. गजेंद्र देवडा

 
@@AUTHORINFO_V1@@