निवडणुकीत अनिकेत पाटील यांच्या बदनामीचे षड्यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |
 

 

अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार : माजी मंत्री विजय नवल पाटील

जळगाव, २३ जून :
विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार असलेल्या माझ्या मुलाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने त्याच्या बदनामीचे षड्यंत्र विरोधी उमेदवाराने रचले आहे. याबाबत निवडणूक आयुक्त आणि पोलिसात तक्रार करणार असून, संबंधित व्यक्ती आणि उमेदवारावर ५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती माजी खासदार विजय नवल पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
विरोधी उमेदवाराने काही पत्रकार व शिक्षकांना हाताशी धरून माझी व माझा मुलगा अनिकेत विजय पाटील यांची प्रतिमा मलीन होईल अशा खोट्या बातम्या प्रसिध्द केल्या. यात आम्ही नवलनगर येथे ग्रामपंचायतीची जमीन हडप केल्यासह इतरही आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात कोर्टातील खटल्याचा निकाल आमच्या बाजूने लागला असतानाही काहींना हाताशी धरून सोशल मीडियावर आमची बदनामी केली जात आहे. खोटी बातमी प्रकाशित करणार्‍या वृत्तपत्राच्या बातमीदाराला अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. येत्या चार दिवसांत हा दावा दाखल केला जाईल, असेही विजय नवल पाटील यांनी सांगितले.
 
 
गुन्हा दाखल असल्याचा खोटा प्रचार
शिक्षक मतदारांच्या मनात उमेदवार अनिकेत विजय पाटील यांची प्रतिमा मलीन होईल व आपल्याला फायदा होईल या हेतूने एका विरोधी उमेदवाराने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. यात आमच्या संस्थेतील एका कर्मचार्‍याला आत्महत्त्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अनिकेत विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे म्हटले आहे. परंतु अनिकेत यांच्यावर असा कुठलाही गुन्हा दाखल नाही. बदनामीचे हे षड्यंत्र सुनियोजित पध्दतीने चालले असल्याचेही विजय नवल पाटील यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@