‘आश्रय: माझे घर’च्या वतीने ‘संवाद स्वतःशी’; उद्या हृद्य उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |
 

 
 
जळगाव, २२ जून :
केशवस्मृती सेवासंस्था समूहातील ‘आश्रय: माझे घर’ ही प्रौढ मतिमंदांचा सांभाळ करणारी संस्था आहे. यात केवळ अशा मुलांचा सांभाळच नाही तर मुलांच्या पालकांचे कायम समुपदेशन देखील करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून ‘संवाद स्वतःशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
प्रमुख वक्त्या निवृत्त आय.ए.एस. अधिकारी नीला सत्यनारायण आहेत. हा कार्यक्रम रविवार २४ जून रोजी सायं. ५ वा. कांताई सभागृहात होईल. सर्वस्तरातील नागरिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
मतिमंद मुलाच्या आईवर झालेल्या आघातून सावरताना, तिने दाखविलेल्या धैर्याची कहाणी विषद करणारे ‘एक पूर्ण अपूर्ण’ या पुस्तकाच्या त्या लेखिका सुद्धा आहे. प्रशासकीय सेवेत राहून देखील आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत अशा विशेष मुलांना सांभाळतांना येणारे खडतर अनुभव आणि त्यावर केलेली यशस्वी मात याविषयी त्या अशा मुलांच्या पालकांशी आणि समाजाशी त्या संवाद साधणार आहे. यावेळी व्यासपीठावर समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड आणि मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे संचालक कस्तुरचंदजी बाफना उपस्थित असतील. केशवस्मृती प्रतिष्ठान समाजाच्या प्रगतीला खिळवून ठेवणार्‍या अनेक बिंदूंवर विचार करून नवनवीन प्रकल्प, उपक्रम आणि कार्यक्रमांची मांडणी करीत असते. त्यातच मतिमंदत्व हा गंभीर प्रश्न निदर्शनात आला. मतिमंद असणार्‍या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा खूप अडचणी येत असतात त्यामुळे त्यांना खास शाळेची गरज असते. मतिमंद मुलांच्या पालकांमध्ये सुद्धा या प्रगतीसाठी काय करावे याविषयी उदासिनता दिसून येते.
 
 
आपल्या मतिमंद पाल्यांसाठी असणार्‍या विशेष शाळेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे, असे सर्व पालकांना मनोमन वाटत असते मात्र कान्हदेशात अशा विशेष मुलांचा सांभाळ करणारी एकही सोय नव्हती. मतिमंद व्यक्तीच्या कुटुंबांचे दुःख जाणून, समाजातील या दुर्लक्षित घटकास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानने काही पालकांना एकत्र करून ‘आश्रय माझे घर’ हे हक्काचे, प्रेमाचे व आयुष्यभराचे घर उभारून दिले आहे. त्याच्यातर्फे हा मनसुन्न करणारा पण उभारी देणारा उपक्रम होत आहे.
आमच्यानंतर काय ? हा पालकांचा प्रश्न सुटला
आमच्यानंतर या मुलांचे काय अश्या अनेक प्रश्नांमुळे पालकांमध्ये कायम अस्वस्थता असते. या मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना सतत भेडसावणारी आहे. याकरिता १८ वर्षांपुढील गतिमंद मुलांचा सांभाळ करण्यासाठी पालकांच्या विचारातून व सहभागातून त्यांच्यासाठी एक कार्यशाळा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे ते सतत व्यस्त राहून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. तर मतिमंदांसाठी डे-केअर सेंटरची देखील सुरुवात करण्यात येणार आहे. सर्व समाजात मतिमंदांविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी, त्यांच्या समोर असणार्‍या अनंत अडचणी समाजासमोर याव्यात हा उद्देश घेऊन संस्थेची पुढील वाटचाल राहणार आहे. ज्यामुळे मुलांच्या जगण्यात सकारात्मक परिणाम होऊन सशक्त समाजाची निर्मिती होईल.
 
@@AUTHORINFO_V1@@