सानपाड्याजवळ शिवनेरी बसला अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसच पलटली



मुंबई : मुंबईतील सानपाड्याजवळ महाराष्ट्र एस.टी. मंडळाच्या शिवनेरी बसला भीषण अपघात झाला आहे. पाठी मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाला असून बसमधील १४ प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत. ज्यातील दोघा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

काल मध्यरात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. पुण्याहून दादरकडे जात असताना सानपाड्याजवळ ही घटना घडली. बसच्या समोर अचानक एक दुचाकीस्वार आल्यामुळे बस चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी वेगाने एका बाजूला झुकत पलटी झाली. यानंतर जवळ असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, तसेच पोलिसांना पाचारण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. तसेच जखमी नागरिकांना उपचारासाठी म्हणून रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@