बीएमसीकडून ५००० रुपये मागायला विसरू नका : नितेश राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |

प्लास्टिक बंदीवरून नितेशराणे यांची बीएमसीवर टीका



मुंबई : महाराष्ट्रात उद्यापासून लागू करण्यात येणाऱ्या प्लास्टिक बंदीवरून आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिका आज जोरदार टीका केली आहे. प्लास्टिक वापरासाठी मुंबई महापालिकेला ५ हजार रुपये दंड देताना, महापालिकेकडून खड्ड्यांसाठी, कचऱ्यासाठी आणि नाल्यासाठीचे आपले ५ हजार रुपये मागण्यास विसरू नका' असा सल्ला राणे यांनी जनतेला दिला आहे. तसेच या नालायकांना जाब विचारण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी जोरदार टीका देखील त्यांनी मुंबई महापालिकेवर केली आहे.

नुकत्याच काही वेळापूर्वी राणे यांनी ट्वीट करून हा मुद्दा उपस्थित केला आहे. नागरिकांनी जर प्लास्टिक वापरले तर त्यांच्याकडून ५ हजार रुपये दंड आकाराला जाणार आहे. परंतु जर रस्त्यावर खड्डे दिसले तर बीएमसीला किती रुपये दंड मागायचा ? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच प्लास्टिक पिशवी चे ५००० रु देताना, मुंबई महानगरपालिकेकडून खड्ड्यांसाठी, कचऱ्यासाठी, नाल्यासाठी आपले ५००० रु मागायला विसरू नका, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे.




 
प्लास्टिक प्रदूषणाला आला घालण्यासाठी म्हणून सरकारने उद्यापासून राज्यामध्ये 'प्लास्टिक बंदी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या नव्या नियमानुसार जर कोणी प्लास्टिकचा वापर केल्यास त्यांच्याकडून पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. तसेच याची कठोर अमलबजावणी करण्याचे देखील सरकारने आदेश दिलेले आहेत. परंतु प्लास्टिकला कसल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांसमोर मात्र एक मोठा पेचप्रसंग उभा राहिलेला आहे.
@@AUTHORINFO_V1@@