कोकणात पावसाचे पुन्हा एकदा पुनरागमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |

मराठवाडा-विदर्भातही दमदार पावसाची अपेक्षा




सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर गेलेल्या मान्सून राजाचे आज कोकणात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन झाले आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणामध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक ठिकाणीची दूरध्वनी व्यवस्था आणि वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच अनेक पाड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काल रात्रीपासून संपूर्ण कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक नद्यांना आणि ओढ्यांना पूर असल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. तसेच पाड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना मदत केली जास्त असून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान कोकणाबरोबरच उर्वरित महाराष्ट्रात देखील आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@