आध्यात्मिक-चिंतनशील कलाकृतींच्या दुर्मीळ मिलाफाचे प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



यशवंत शिरवाडकर, हौसेराव पाटील, नीला शेटे, सोनाली अय्यंगार आणि सुनील सेठी या नामवंत कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सिमरोझा आर्ट गॅलरीमध्ये २६ ते ३० जूनदरम्यान

मुंबई, जून २०१८ : मुंबईकर कलासक्त रसिकांना चित्रे, दुर्मीळ कलाकृती आणि शिल्पकला यांचे दर्शन घेण्याचा योग सिमरोझा कलादालनात होणार्‍या एका प्रदर्शनाच्या माध्यमातून जुळून येणार आहे. यशवंत शिरवाडकर, हौसेराव व्ही. पाटील, नीला शेटे, सोनाली अय्यंंगार आणि सुनील सेठी या ज्येष्ठ कलाकारांच्या या कलाकृती असून आध्यात्मिक आणि चिंतनशील अशा कलाकृतींचा हा अगदी दुर्मीळ असा मिलाफ आहे. हे प्रदर्शन सिमरोझा आर्ट गॅलरी, भुलाभाई देसाई रोड, ब्रीच कॅन्डी, मुंबई येथे २६ ते ३० जूनदरम्यान सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेत खुले राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे.

यशवंत शिरवाडकर हे एक ज्येष्ठ आणि प्रख्यात कलाकार असून त्यांच्या नावावर ९८ एकल प्रदर्शने आहेत. त्याशिवाय ते अनेक समूह प्रदर्शनांमध्येही सहभागी झाले आहेत. त्यांनी जगभर प्रवास करून अनेक समूह प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला असून तेथे पुरस्कारही पटकावले आहेत. त्यांची चित्रे अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांमध्ये लावली गेली आहेत.

हौसेराव पाटील हे सांगली येथील एक ज्येष्ठ कलाकार आहेत. ते सांगली कॉलेज ऑफ आर्टस्मधून अधिष्ठाता म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी ३५ वर्षे अत्यंत लोकप्रिय शिक्षक म्हणून सेवा बजावली. देशात अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कलाकृतींची एकल प्रदर्शने भरवली. त्यांच्या कलाकृती अनेक प्रतिष्ठित कलेक्शनमध्ये आहेत. सुरुवातीला निसर्गचित्र कलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली, पण नंतर त्यांनी ‘पॉइंटेल्ला’ या तंत्रामध्ये प्राविण्य मिळविले. हेन्री मॅटीस या रेनेसाँ कलाकाराप्रमाणे त्यांच्या चित्रांमध्ये गूढतेचा परिणाम साधला जातो. ते शुभ्र रंग वापरतात आणि त्यांचा चित्रप्रकार अगदी साधा आहे. त्यातून ते निसर्गाला अगदी उत्साहवर्धक आणि अस्सल रूप देतात.

नीला शेटे या स्वतःच चित्रकला शिकल्या आहेत. त्यांनी अनेक प्रदर्शनासाठी संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अमेरिकेत वॉशिंग्टन येथे वर्ल्ड बँक आर्ट गॅलरीमध्ये दिल्ली येथील आघाडीच्या कलाकारांचे एक प्रदर्शन भरविले होते. नीला या आर्म्स अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. त्यांनी कलेवर विविध वर्तमानपत्रांमध्ये अनेक लेख लिहिले आहेत.

सोनाली अय्यंगार यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाईन आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे. त्यांनी व्हिज्युअल आर्टमधून दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला असून एसएनडीटी विद्यापीठात त्या अव्वल क्रमांक घेवून उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांनी अनेक एकल आणि समूह प्रदर्शनांमध्ये भाग घेतला होता आणि देशात अनेक ठिकाणी त्यांनी प्रतिष्ठेच्या अशा प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता. त्या एक उत्तम फाइन आर्ट कलाकार आहेत, तसेच मनोविज्ञानी, कला पुनर्संचयक, कलासंवर्धक, समकालीन कलाकार, पोर्ट्रेट कलाकार, अमूर्त, अर्ध-अमूर्त चित्र कलाकार, कार्यशाळा विकासक अशा विविध भूमिका त्या पार पडतात. चित्रकला, चित्रे, ग्राफिक कलाकार, शिक्षणतज्ञ, कला सल्लागार अशा विविध क्षेत्रांत त्या कार्यरत आहेत.

सुनील सेठी हे ‘ऑब्जेट डी’आर्ट अँड आर्ट कसल्टन्सी’ चे आंतरराष्ट्रीय प्रवर्तक आहेत. इंटरआर्ट्स या कॉर्पोरेट जगत आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना समकालीन कलाकृती पुरविणार्‍या संस्थेने त्यांच्या अनेक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. युनायटेड किंगडम आणि युरोप येथील अनेक शिल्पकला आणि कलाकृती या प्रदर्शनात अगदी किफायतशीर किमतीत मिळणे अपेक्षित आहे. तेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असेल.

प्रदर्शन - यशवंत शिरवाडकर, हौसेराव व्ही. पाटील, नीला शेटे, सोनाली अय्यंगार आणि सुनील सेठी या ज्येष्ठ व नामवंत कलाकारांच्या आध्यात्मिक-चिंतनशील अशा कलाकृतींच्या दुर्मीळ मिलाफ असलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन.

स्थळ - सिमरोझा आर्ट गॅलरी, भुलाभाई देसाई रोड, ब्रीच कॅन्डी, मुंबई ४०००२६

तारीख - २६ ते ३० जून २०१८ ,वेळ - सकाळी ११ ते रात्री ७ वाजेपर्यंत

@@AUTHORINFO_V1@@