संभाजी बिग्रेडने केलेल्या हल्ल्याविरोधात निषेध सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |
 

 
पुणे :  सिंदखेडराजा येथील हिंदुत्ववादी व्याख्याते श्री.सचिन पाटील हे पातुर येथून व्याख्यान संपवून परतत असताना संभाजी बिग्रेड या झुंडशाही करणाऱ्या संघटनेच्या पंकज जायले या गुंडाने व त्याच्या साथीदारांनी श्री.सचिन पाटील यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला केला त्याविरोधात पुणे येथे संभाजी बिग्रेड विरोधात निषेध आयोजित करण्यात आली होती. १० जून रोजी  होता. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत याठिकाणी निषेध नोंदवला.
या निषेध सभेत माजी खासदार प्रदीप रावत यांनी म्हटले कि, सचिन खरा इतिहास सांगतोय म्हणून ब्रिगेड त्याला घाबरते आहे आणि म्हणूनच असा हल्ला केला. अतार्किक खोटा, एकांगी इतिहास सांगून हिंदू समाजाची एकजूट तोडण्याचे काम हे ब्रिगेडी गट करत आहेत. व काही जातीवादी राजकारणी या फुटीरतेला खतपाणी घालत आहेत. हिंदुत्व हे व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. हिंदुत्वात काय येते व काय येत नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, जातीभेद विरहित सर्वसमावेशक हिंदुत्व समजून घेऊन तसा व्यवहार वाढण्याची आवश्यकता आहे. पुढील काळात प्रेरणाक्षेत्र सिंदखेडराजा येथे एक लाख संख्येचा कार्यक्रम करूयात असे जाहीर केले.
 
 

 
 
तसेच शिवव्याख्याते सचिन पाटील यांनी या सभेत मनोगत व्यक्त केले ते म्हणाले कि, मी माझे वैचारिक मते तर्काने, अभ्यासाने, व्यक्त करतो म्हणून माझी अभिव्यक्ती, माझा आवाज बंद करण्यासाठी हा नियोजीत भ्याड हल्ला केला गेला. परंतू मी माझे विचार मांडत राहणार व वैचारिक संघर्ष करत राहणार.
या निषेध सभेत राजे शिवराय प्रतिष्ठान चे महेश पवळे, निलेश भिसे, भाजपा चे दिपक नागपुरे, भाजयुमो चे राम सातपुते, भाजप चे सुनील मारणे, विहिंप पुणे चे किशोर चव्हाण, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अविनाश मरकळे, समस्त हिंदू आघाडी चे सौरभ करडे, सशक्त भारत चे संदीप महिंद, शिवसेनेचे सतीश बनपट्टे,रा.स्व.संघाचे नागेश पाटील, तुषार दामगुडे, महाराजाधिराज प्रतिष्ठान चे शैलेश वरखडे, जगदंब प्रतिष्ठान चे लौकेश काची इ. विविध संघटनांचे प्रतिनिधींनी विचार व्यक्त केले. पाऊस पडत असतांनाही कार्यकर्ते या निषेध सभेस उपस्थित होते. या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला कि अशा प्रकारचे हिंसक हल्ले कदापी सहन केले जाणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@