जम्मू काश्मीर येथे चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |
 
 

अनंतनाग :
जम्मू काश्मीर येथे सुरु दहशतवादी कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासनू जम्मू काश्मीर येथे परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातून भारताने शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर दहशतवाद विरोधी कारवायांना वेग आल्यामुळे दहशतवादी देखील चेकाळले आहेत. आज पुन्हा जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक झाली. दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला असता, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. 
 
 
 
 
शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर लष्काराच्या दहशतवादविरोधी कारवाईला वेग आला आहे. सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली असून दोन-तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे वृत्त आहे. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवारा भागांत ही चकमक सुरू आहे.
 
सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पुलवामा जिल्ह्यात गुरूवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस जखमी झाले होते. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमध्ये मध्ये लागू केलेली शस्त्रसंधी गेल्या आठवड्यातमागे घेतली. त्यानंतर लष्काराच्या दहशतवादविरोधी कारवाईला वेग आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@