जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला, ८ जवान जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील त्राल सेक्टरमध्ये आज दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला खडवून आणला आहे. या हल्ल्यात आठ जवान जखमी झाले आहे. या जखमी जवानांवर उपचार केले जात आहे. मात्र या ठिकाणी आता दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण ठिकाणाला घेराव घातला आहे. 
 
 
 
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्रसंधी मागे घेतल्या घेतल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर येथील बांदीपुरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. या चकमकीत बऱ्याच दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात लष्कराला यश आले आहे. मात्र दहशतवादी आणि जवान यांच्यात अजूनही चकमक सुरुच आहे.
 
 
 
आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून त्राल सेक्टरमध्ये ग्रेनेड हल्ला करण्यात आला असल्याने आता तेथील भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे आणि संपूर्ण भाग बंद करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@