डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक २०२० मध्ये पूर्ण होणारच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



 

राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला विश्वास


मुंबई : “इंदू मिल येथील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून १४ एप्रिल २०२० पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण होईल,” असा विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा आढावा बैठकीस तसेच कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बडोले यांनी इंदू मिलच्या जागेवर शुक्रवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

 
 

इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले असून सदर जमिनीचा सातबारा महाराष्ट्र शासनाच्या नावावर असून त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तसेच जुने बांधकाम पाडण्याचे कामही पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी निवीदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे. शापूर्जी पालनजी कंपनीला काम देण्यात आले असून बांधकामाला प्रत्यक्ष सुरूवातही झाली असल्याची माहिती बोले यांनी यावेळी दिली. दरम्यान, आतापर्यंत १३४ शोअर पाईल्सचे काम पूर्ण झालेले असून या परिस्थितीतही काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या प्रश्नावर राजकारण करून आंबेडकरी अनुयायांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम करीत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे १४ एप्रिल २०२० पूर्वी या स्मारकाचे काम आम्ही पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निधीची कमतरता पडणार नाही

“स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण होईल, निधीची कुठेही कमी पडणार नाही. संपूर्ण स्मारकाच्या उभारणीचा ७६३ कोटी रूपयांचा खर्च आहे. यावर्षीच्या कामासाठी १५० कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आलेली असल्यामुळे कामात कोणताही अडथळा येणार नाही, नियोजित वेळेतच प्रकल्पाचे काम पूर्ण होईल,” असे बडोले यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@