मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

सामाजिक न्यायमंत्र्यांना विद्यार्थी संघटनांनी घातला घेराव

 
 
 
मुंबई : मुंबईतील अल्पसंख्याक महाविद्यालयात मागासवर्गीय व इतर आदिवासी जमातींना प्रवेश नाकारण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत बुधवारी मंत्रालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना घेरावा घालण्यात आला. विद्यार्थी संघटनांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सामाजिक कल्याण विभागाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहीती राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष अमोल मटेले यांनी दिली.
 
 
मुंबई विद्यापीठातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कोट्यासंदर्भातील निर्णयाविरोधातात सेंट झेवियर्स महविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्यांनी २००१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ही याचिका १० ऑक्टोबर २०१७ ला निकाली निघाली असून न्यायालयाने सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या बाजूने निर्णय देत, मागासवर्गीय कोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची अमलबजावणी मुंबई विद्यापीठाने या वर्षापासून केली आहे. मात्र या निर्णयाचा फटका मागासवर्गीयांना बसत असून नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत हे दिसून आले. त्यामुळे या प्रश्नी आता विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
@@AUTHORINFO_V1@@