घरतच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

डोंबिवली: कडोंमपाचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्या जामीन अर्जावर गुरुवारीही निर्णय होऊ शकला नाही. शुक्रवारी यावर निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने घरत याला गुरुवारची रात्र ही ठाणे कारागृहात घालवावी लागली. वॉरंट घेण्यावरून निर्माण झालेला कायदेशीर पेच आणि जामीन अर्जावरील लांबलेल्या निर्णयामुळे घरत याला कारागृहाचा अतिरिक्त पाहुणचार घडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
 

घरत याला मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करत तो रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाला होता. बुधवारी त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी ही आता गुरुवारी होणार होती व त्यामुळे त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे. न्यायालयाने या तिघांना २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी संजय घरत यांच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी घरत याच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत गुरुवारी यावर निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र गुरुवारी हा निर्णय झाला नसल्याने घरतच्या जामिनाची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

कडक कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

लाचखोर घरत महापालिकेत राहू नये यासाठी निलंबनाचा ठराव आधीच महापालिकेने पारित केला आहे. आता त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित असताना यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@