डीएसके प्रकरण : रवींद्र मराठे रुग्णालयात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



पुणे : डी.एस.कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष रवींद्र मराठे यांना आज ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री अचानक छातीमध्ये त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल कान्र्यात आले असून सध्या त्यांच्या उपचार सुरु आहेत.


डीएसके प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काल मराठे यांच्यासह तब्बल सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर पुणे सत्र न्यायालयाने मराठे यांच्यासह अन्य आरोपींना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार पोलिसांनी मराठे यांच्यासह सर्वाना पोलीस कोठडीमध्ये ठेवले होते. यानंतर मध्यरात्री अचानक मराठे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना त्रास सुरु झाला. म्हणून पुणे पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांच्या तपासानंतर मराठे यांचा रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच योग्य देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे द्केहील त्यांनी म्हटले आहे.


डी.एस.कुलकर्णी यांना त्यांच्या 'ड्रीम सिटी' या प्रकल्पासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने तब्बल ६५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जासंबंधीच्या चौकशीसाठी म्हणून पुणे पोलिसांनी काल मराठे यांच्यासह बँकेचे अधिकारी असलेले आर.के.गुप्ता आणि पद्माकर देशपांडे यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. या तपासामध्ये मराठे यांनी अनेक नियमांची पायमल्ली करत डी.एस.कुलकर्णी यांना कर्ज दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
@@AUTHORINFO_V1@@