कल्याण शहर भाजप यु मो. सरचिटणीस शैलेश नारकर यांची नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

कल्याण: कल्याण शहर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा सरचिटणीस शैलेशजी नारकर यांची नियुक्ती कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण शहर सरचिटणीस अमित धाक्रस आणि भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष भगवान म्हात्रे यांनी नुकतीच केली. नवनिर्वाचित नियुक्त झालेले शैलेश नारकर यांनी भाजप यु.मो. संघटना रचनात्मक काम करणार असल्याचे सांगितले. तसेच १८ ते ४० वयोगटातील युवकांना जास्तीत जास्त संघटनेशी जोडून रचनात्मक कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप युवा मोर्चा अथक परिश्रम करून निरंजन डावखरे यांना कल्याण, पश्चिम विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त मत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@