आधुनिक जीवनशैलीत योगाचेमहत्त्व कायम : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चा प्रस्ताव मांडला आणि त्याचे स्वागत करीत आज जगातील १७५ देशांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय प्राचीन चिकित्सा पद्धती असलेल्या योगाला पुन्हा एकदा लोकमान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच शरीर आणि मनाला तंदुरुस्त ठेवण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे निर्माण होणार्‍या विविध व्याधींवर योग हितकारक ठरला आहे. तरुणाईने आधुनिक जीवनशैली अंगीकारतानाच योगाभ्यासदेखील केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मंत्रालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा

चौथ्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमित्त मंत्रालय परिसरात मोठ्या उत्साहात ‘योग दिन’ साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि द योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, विविध विभागाचे सहसचिव, उपसचिव यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी-कर्मचार्‍यांनी यामध्ये सहभाग घेतला.

@@AUTHORINFO_V1@@