विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |




आ. निरंजन डावखरे यांना विश्वास

 

पेण : गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार म्हणून केलेली विकासकामे हाच माझ्या कार्याचा अहवाल आहे. आगामी काळात कोकणातील विकास आणि पदवीधरांच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच माझा प्रयत्न आहे. आरोप कोणीही करोत, मी केलेल्या विकासकामांची पोचपावती पदवीधर मतदार मला देऊन पुन्हा आमदार बनवतील,” असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे पेण येथे पदवीधर व कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांना मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

 

या बैठकीत मतदारांना मतदान करण्यासंबंधी साक्षर करण्यासाठीच्या गाईडलाईनदेखील देण्यात आल्या. आ. संजय केळकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, ”देशातील सर्वसामान्य जनतेला तीन हजार आठशे कोटींचे शेती कर्जसाहाय्य तर साडेतीन कोटीहून अधिक सर्वसामान्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या जोडीला राज्यात देवेंद्र फडणवीस यांनीही विकासकामांचा झपाटा लावला. त्यामुळे भाजपचा विजय रोखणे आता विरोधकांना अवघड झाले आहे. येत्या निवडणुकीतही पदवीधर मतदारांनी निरंजन डावखरे यांनाच पहिली पसंती देऊन विजयी करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा आ. प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. या मेळाव्यात पेण तालुका भाजप अध्यक्ष गंगाधर पाटील, विष्णू भाई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@