विधानपरिषद निवडणूकीत तेवीस उमेदवार कोट्याधीश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



एडीआरचा अहवाल


मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात अटीतटीची लढाई सुरु आहे. यावेळी चुरशीच्या होत असलेल्या लढतीत उतरलेल्या ५२ पैकी ५१ उमेदवारांची माहिती उघड झाली आहे. विधानपरिषद निवडणुका म्हटले की तो पैशांचा खेळच असे आपल्याकडे मानले जाते. या निवडणुकीलाही अपवाद मानता येणार नाही, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या दिल्लीस्थित संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे, एडीआरला मिळालेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ५१ उमेदवारांपैकी २३ उमेदवार हे कोट्याधीश आहेत. त्यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत नाशिक विधान परिषद मतदारसंघातून रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार प्रताप सोनावणे हे आहेत. त्यांच्याकडे ११ कोटी ६५ लाखांची जंगम तर ४६ कोटी ४५ लाखांची स्थावर मालमत्ता असे मिळून सर्वाधिक ५८ कोटींची मालमत्ता आहे.

 

त्यांच्यामागोमाग निरंजन डावखरे आहेत. त्यांची ३५ कोटींची मालमत्ता आहे. स्वत:चे वैयक्तीक उत्पन्न जास्त असणार्‍यांच्या यादीत पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अमित मेहता हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी 0 लाखाच्या उत्पन्नाचा दावा केला आहे, क्रमांक एकचे कोट्यधीश उमेदवार सोनावणे यांनी मात्र स्वत:चे वैयक्तीक उत्पन्न ३९ लाख ५६ हजाराचे उत्पन्न दाखवले आहे. या कोट्यधीशांच्या गर्दीत ऍड. अरुण नाथुजी आंबेडकर हेही आहेत, ज्यांनी फक्त सात हजारांची मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.

कोट्याधीश टॉप १०

) प्रताप सोनावणे- अपक्ष नाशिक ५८ कोटी

) निरंजन डावखरे- भाजपा कोकण ३५ कोटी

) किशोर दराडे- अपक्ष नाशिक ३१ कोटी

) चंदन शर्मा- अपक्ष मुंबई १९ कोटी

) नजिब मुल्ला राष्ट्रवादी- कोकण १५ कोटी

) अनिकेत पाटील- भाजपा नाशिक १३ कोटी

) कपिल पाटील - लोकभारती मुंबई .२८ कोटी

) विलास पोतनीस- शिवसेना मुंबई .0 कोटी

) संदिप बेडसे- अपक्ष नाशिक कोटी

१०) बाळासाहेब म्हात्रे- अपक्ष मुंबई कोटी

@@AUTHORINFO_V1@@