महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

जिल्हा महानगर बैठकीत महानगराध्यक्ष आ. सुरेश भोळे यांचा दृढविश्‍वास
बूथ रचना, संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

जळगाव  :
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी सर्वांनी संघटनात्मक बांधणी भक्कम करावी, असे आवाहन पक्षाचे जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी केले. महापौर भाजपचाच होईल असा दृढविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
भाजपा जिल्हा महानगराची बैठक नुकतीच आ. भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महापालिकेत पक्षाची एकहाती सत्ता आणायची असून, त्यासाठी सर्वांनी बुथ रचनेवर भर द्यावा. महाविस्तार संपर्क अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारची कामे जळगावकरांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
कार्यकर्त्यांची मेहनत आणि पक्षाच्या संघटनात्मक कार्याने महापालिकेत भाजपचा महापौर नक्कीच होईल, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीत योगदिन कार्यक्रमाचे आयोजन आणि विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. सुरुवातीला सरचिटणीस महेश जोशी यांनी बूथनिहाय मंडलांचा आढावा सादर केला. पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी केले. आभार विशाल त्रिपाठी यांनी मानले.
 
 
अनिकेत पाटील यांना मतदानाचे आवाहन
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जळगाव शहरातून पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिकेत पाटील यांना मोठ्या फरकाने मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. भोळे यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@