काम केले नाही तर कारवाई अटळ : मुंढे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेपत्ता झाल्यानंतर घरी परतलेले अभियंते रवींद्र पाटील यांच्याबाबत पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. रवींद्र पाटील घर सोडून गेले तेव्हाच मी बोललो होतो की, ते परत येतील. पळून जाण, प्रेशर आणण हे सोडा. तुम्ही हे स्वत: करत आहात की, तुमच्याकडून हे कोणी करवून घेत आहे. तुम्ही काम नाही केल तर तुमच्यावर कारवाई होणारच, असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना भरला आहे.

 

बुधवारी त्यांनी एका व्याख्यानमालेत सविस्तरपणे पहिल्यांदाच आपली बाजू मांडली. ''महापालिकेचे अधिकारीच माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मात्र दोषी आढळणाऱ्या एकाही अधिकाऱ्यांला मी सोडणार नाही,” अशा शब्दांत मुंढेंनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

 

जागतिक दर्जाची बससेवा देणार

 

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले, नाशिककरांना पायाभूत सुविधा हव्या आहेत. त्यातीलच एक भाग शहर बससेवेचा आहे. नाशिककरांना जागतिक दर्जाची बससेवा उपलब्ध केली जाऊ शकते. सार्वजनिक वाहतूक वाढून खासगी वाहतूक बंद होणे, हा त्यामागचा साधा सरळ हेतू आहे. नाशिक मनपा लवकरच शहर बससेवा सुरू करणार आहे. त्यासाठी रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल निर्माण करण्याचे काम सुरू असून इतर वाहतुकीपेक्षा कमीत कमी खर्चात ही बससेवा नाशिककरांसाठी लवकरात लवकर सुरू केली जाईल. मात्र ठरलेले तिकीटदर हे बसच्या परिस्थितीवर अवलंबून असतील.

@@AUTHORINFO_V1@@