जून २०१९ पर्यंत सेन्सेक्स जाणार ४४ हजार बिंदूंवर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

मॉर्गन स्टॅन्ले या जागतिक गुंतवणूक बँकेचे अनुमान.
मंदी आल्यास सेन्सेक्स २६ हजार ५०० बिंदूंपर्यंत घसरण्याची शक्यता

 
 
सतत वरखाली जाण्याची सेन्सेक्सची परंपरा कायमच
व्यापार युद्धामुळे शेअर्स विक्रीत वाढ
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) येत्या जून २०१९ पर्यंत ४४ हजार बिंदूंपर्यंत जाण्याची शक्यता जागतिक गुंतवणूक बँक मॉर्गन स्टॅन्लेने व्यक्त केली आहे. अपेक्षेपेक्षाही अधिक चांगले कंपन्यांचे निकाल व धोरणात्मक सुधारणांचे जागतिक पातळीवरील परिणाम हे यास कारणीभूत ठरतील असेही मॉर्गनने म्हटले आहे. तसेच या वर्षातील निवडणुकांचा सत्ताधारी पक्षासाठी अनुकूल निकालही बाजाराला उभारी देणारा ठरणार असल्याचेही मॉर्गनेने म्हटले आहे.
 
पण एखाद्या वेळेस बाजारात मंदी आली तर मात्र सेन्सेक्स २६ हजार ५०० बिंदूंच्या पातळीपर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर मात्र त्यात वाढ होऊन तो पूर्वीपेक्षाही अधिक वाढू शकतो असेही या जागतिक गुंतवणूक बँकेचे मत आहे. गेल्या अनेक दशकांच्या इतिहासावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे .
 
 
याआधीही सेन्सेक्स अनेकदा मोठ्या प्रमाणावर घसरत जाऊनही नंतर त्याने ‘पुनश्‍च हरी ओम’ करीत आपली पुढील वाटचाल जोमाने सुरु ठेवलेली आहे. अगदी २००८ मधील महामंदीतही सेन्सेक्स २१ हजार बिंदूंवरुन जवळपास एक तृतीयांशाने घटून ७ हजार बिंदूंच्या पातळीपर्यंत आलेला होता. पण २००९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर एका वर्षातच तो पुन्हा पूर्ववत २० हजार बिंदूंच्या पलीकडे निघून गेला होता.
 
 
अशा रीतिने वरखाली जाण्याची या निर्देशांकाची परंपरा नेहमीच कायम राहिलेली आहे. २०१३ मध्येही हा निर्देशांक १४ हजार बिंदूंपर्यंत घसरलेला असतांना त्याचे पुनरुज्जीवन २०१४ मधील निवडणुकीनंतर केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच येताच त्याने २५ हजार बिंदूंपर्यंत व काही महिन्यांनंतर २८ हजार बिंदूंपर्यंत झेप घेतली होती. त्यानंतरही त्याची यशस्वी वाटचाल सुरुच राहून त्याने २०१५ मध्ये ३० हजार बिंदूंची मानसशास्त्रीय पातळी (सायकॉलॉजिकल लेव्हल) पार केली होती. ती पार करताच त्याची २०१६ च्या फेबु्रवारीअखेरीस २३ हजार बिंदूंपर्यंत घसरण होऊन तो पुन्हा एका वर्षातच म्हणजे मार्च २०१७ मध्ये ३० हजार बिंदूंच्या पातळीवर आलेलहोता. तो तेवढ्यावरच न थांबता त्याच वर्षी ३५ हजार बिंदू व यावर्षीच्या जानेवारीत ३६ हजार बिंदूंचीही पातळी गाठली होती.
 
 
पण फेब्रुवारीत केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळणार्‍या कमाईवर कर (एलटीसीजी) जाहीर करताच सेन्सेक्सची पुन्हा उतरती भांजणी सुुरु झाली असून तो ३२ हजार बिंदूंपर्यंत गडगडला होता. त्यातूनही तो सावरला असून त्याने परत ३५ हजार बिंदूंची पातळी गाठलेली आहे.
 
 
आता येत्या वर्षभरातील विधानसभा निवडणुका (सेमी फायनल) व लोकसभा निवडणूक (फायनल) पार पडल्यानंतर सेन्सेक्सचे काय होणार? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण त्याचे उत्तर तोच देऊ शकतो. सध्यातरी आपल्या हातात केवळ अंदाज बांधण्याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही. म्हणून सेन्सेक्सच्या इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास त्याचे पुनरुत्थान होण्याची व तो आणखी नवी शिखरे गाठण्याचीच दाट शक्यता राहणार आहे. तशी आशा करण्यास हरकत नाही.
या जागतिक गुंतवणूक बँकेने मिडकॅप (मध्यम किंमतीचे शेअर्स असलेल्या कंपन्या)पेक्षाही लार्जकॅप (भारी किंमतीचे शेअर्स असलेल्या कंपन्या)वरच अधिक भर दिलेला आहे. तिच्या मते सध्या खाजगी बँका व किरकोळ ग्राहक क्षेत्र सकारात्मक असून आरोग्यसेवा क्षेत्र मात्र नकारात्मक आहे.
 
 
तज्ञांच्या मतानुसार चीन अमेरिका व्यापार युद्धाचा परिणाम विदेशी गुंतवणुकदारां (एफआयआय) द्वारा शेअर बाजारातील विक्रीत वाढ होण्यावर झालेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सध्या १० हजार ७०० बिंदूंच्या वर असला तरीही त्याची १० हजार ७०० ते १० हजार बिंदूंची आधार पातळी अत्यंत महत्वाची ठरणारी आहे. जर निफ्टीने १० हजार ६८० बिंदूंची पातळी तोडली तर तो थेट १० हजार ५०० बिंदूंपर्यंत घसरु शकतो असेही तज्ञांनी म्हटले आहे. तसेच निफ्टीच्या उसळीला १० हजार ८०० ते १० हजार ८५० बिंदूंदरम्यान अटकाव होऊ शकतो असेही तज्ञांना वाटत आहे.
 

शेअर बाजारात मोठी वाढ, वधारले दोन्ही निर्देशांक - बुधवारी शेअर बाजारात मोठी वाढ होऊन त्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) व मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) हे दोन्ही महत्वाचे निर्देशांक वधारले. निफ्टी मंगळवारच्या बंद १० हजार ७१० बिंदूंवरुन आज सकाळी १० हजार ७३४ बिंदूंवर उघडत १० हजार ७८१ बिंदूंच्या उच्च तर १० हजार ७२४ बिंदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत जाऊन आला होता. सेन्सेक्स तर कालच्या ३५ हजार २८६ बिंदूंवरुन सकाळी ३५ हजार ३२९ बिंदूंवर उघडून ३५ हजार ३२९ बिंदूंच्या खालच्या तर सकाळीच उघडलेल्या ३५ हजार ५७१ बिंदूंच्या वरच्या पातळीपर्यंत जाऊन आला होता. दिवसअखेरीस निफ्टी ६१ बिंदूंनी वाढून १० हजार ७८१ बिंदूवर तर सेन्सेक्स २६० बिंदूंनी वाढून ३५ हजार ५४७ बिंदूंवर बंद झाला. निफ्टीचा १० हजार ७०० बिंदूंचा आधार तुटल्यास तो १० हजार ५०० बिंदूंपर्यंत खाली जाऊ शकतो.

 
@@AUTHORINFO_V1@@