सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौथा योग दिन उत्साहात साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |
 


 
 
 
पुणे :  “योग हा प्राचीन भारतीय परंपरेनुसार आरोग्य संवर्धनासाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोजच्या जीवनात योग जगणे आवश्यक आहे. तणावमुक्तीपासून आरोग्य संवर्धनासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे.” असे प्रतिपादन चौथ्या योग दिनादिवशी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज चौथा योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे अधिष्ठाता डॉ. अशोक चव्हाण, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ आणि शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे संचालक डॉ. दीपक माने आदी उपस्थित होते. योग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक याविषयी मार्गदर्शन के नजीब आणि पल्लवी कव्हाणे यांनी केले.
 
आज सकाळी मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने योग प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्य इमारती मागील हिरवळीवर प्रभात फेरी पोहोचल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सुमारे २५०हून अधिक राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यापीठ परिसरातील नागरिक आणि कर्मचारी वर्गाच्या मोठ्या प्रतिसादात हा कार्यक्रम संपन्न झाला.
 
 
 
 
त्याआधी सकाळी आंतरराष्ट्रीय केंद्र आणि आयसीसीआर यांनी संयुक्तपणे योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर)चे विभागीय संचालक मल्कित चंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे २६ देशांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन योग प्रात्यक्षिके केली. या वेळी योग प्रशिक्षक चंद्रशेखर गर्गे यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिके करण्यासाठी मार्गदर्शन केले.
 
योग दिनानिमित्ताने शुक्रवारपासून विद्यापीठात योग प्रशिक्षण -
 
⦁ सलग ७ दिवस विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला राहणार आहे. प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य यानुसार १०० व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल. योग दिन (२१ जून)पासून सुरू झालेला हा कार्यक्रम गुरुवार दि. २८ जूनपर्यंत सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे.
 
 
⦁ योग अध्यासनामार्फत प्राचीन योग परंपरा व पद्धती तसेच विचारांचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी योग विषयक स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात सध्या सुरू असल्याचे यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@