पुणे हे देशाचे दुसरे 'ग्रोथ इंजिन' : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

 पुणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन


 
 
पुणे : पुणे महापालिकेच्या नूतन इमारतीचे आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उदघाटन झाले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे, राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलिप कांबळे, आमदार विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. १४ हजार चौरस मीटर या इमारतीचे बांधकाम ३ वर्षे आणि ३ महिन्यात पूर्ण झाले आहे. या इमारतीसाठी ४८.७५ कोटी रूपये खर्च करण्यात आला. या इमारतीत बेसमेंट दुमजली पार्किंग असून, त्यावर तीन मजले आहेत, त्यात अनेक नागरी सुविधांचे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.
 
 
 
पुणे महापालिकेच्या पहिल्या इमारतीचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. आज या नव्या इमारतीचे विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी उदघाटन केले हा विशेष योगायोग आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या इमारतीतील सभागृहाला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. त्यामुळे येथे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी व्यापक चर्चा होऊन निर्णय घेतले जावेत. आज पुणे हे आपल्या देशाचे दुसरे ग्रोथ-इंजिन म्हणून ओळखले जाते. या शहराच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. मेट्रो, नवीन विमानतळ, रिंगरोड अशा अनेक प्रकल्पांवर काम होते आहे. स्वारगेट येथे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब साकारले जात आहे. सर्व पुणेकरांच्या हितासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करते आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@