जामनेर भाजपातर्फे उदय वाघ यांच्यावरील आरोपाचा निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

चौकशीचेही आव्हान, नवाब मलिक यांच्यावर कारवाई करा; तहसीलदारांना निवेदन

 
जामनेर :
वाकडी प्रकरणानिमित्त जिल्हा दैर्‍यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरूद्ध खोटे नाटे बदनामीकारक आरोप करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही उदय वाघ यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी भूमिका घेत या विरोधात चौकशी व कारवाईचे मागणी करणारे निवदेन जामनेर भाजप तालुक्याच्यावतीने नायब तहसिलदार परमेश्वर कासुडे यांना देण्यात आले.
 
 
पायाखालची वाळू सरकल्यामुळे रिकामे उद्योग
अमळनेरच्या अवैध धंद्याच्या खोट्या, कथित व्हिडीओ क्लिपच्या आधारावर वाघ यांची बदनामी केली आहे. राज्यात व देशात जनता खुश आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकल्यामुळे व सत्तेपासून दूर राहावे लागल्याने वैफल्यग्रस्त होवून अश्या प्रकारे बदनामी करून पक्षाची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी भाजपा जामनेर तालुक्याच्यावतीने करण्यात आली.
 
 
निवेदन देतेवेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिकेतील गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, शहराध्यक्ष अतिष झाल्टे, नवल पाटील, दीपक तायडे, गोपाल नाईक, कैलास नरवाडे,रविंद्र झाल्टे, समाधान उघडे आदीं उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी शासनस्तरावर सखोल चौकशी आणि कारवाई व्हावी, अशी विनंतीही निवेदनात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@