महापालिकेची प्रसूतिगृहे खासगी संस्था चालवणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

मुंबई : मुंबई महापालिका उपनगरातील तीन प्रसूतिगृहे बंद करून तेथे खासगी सहभागातून प्रसूतिगृह चालविले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

एकामागोमाग एक प्रसूतिगृहे बंद करण्याचा तगादा प्रशासनाने लावल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबईतील दहिसर व भांडूप या परिसरातील तीन प्रसूतिगृहे सध्या बंद पडली आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातील महिलांना भरमसाट पैसे मोजून खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी जावे लागत आहे.

रुग्णांच्या रोषामुळे पालिका प्रसूतिगृहे खासगी संस्थांना चालविण्यास देणार आहे. भांडूप पूर्वेकडील जुवेकर मार्गावरील प्रसूतिगृह विकासकाच्या दिरंगाईमुळे अनेक वर्षांपासून बंद होते. मात्र, आता मार्गी लागल्याने मे. अनुपम मॅटर्निटी होम या संस्थेला १५ वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपये प्रतिचौरस भाड्याने दिले जाणार आहे. दहिसर येथील रुस्तमजी कॉलनी हे प्रसूतिगृह मे. मित्ती इन्व्हेस्टमेंट अँड कन्सल्टन्सी या संस्थेला १६२३.५६ चौ.मी. जागा १ रुपये दराने १५ वर्षांसाठी देणार आहे. हरीशंकर जोशी मार्गावरील ही ७०० चौ.मी. ची जागा डॉ. एम. एल ढवळे मेमोरियल ट्रस्टला १५ वर्षांसाठी देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या सुधार समितीत मांडण्यात आला आहे. यात ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे व ४ मार्च २०१८ ला संपलेल्या कराराच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाचा समावेश असल्याने नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@